वराड बुद्रुक ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार; ग्रामस्थांचे जळगाव पंचायत समितीला निवेदन

 

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीत आलेल्या निधीत लाखोंचा अपहार व गैरकारभार झाला असून व्यवहाराचे दप्तर ग्रामपंचायत म्हणून गायब आहे. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात जळगाव पंचायत समितीला निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील वरुड बुद्रुक ग्रामपंचायत निधीतील अपहार व गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, याबाबत अर्ज दिला होता. या अर्जावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेले नाही, तसेच गावातील ग्रामपंचायतीचे दप्तर हे ग्रामपंचायतमध्ये नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. १५ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत दत्तराबाबत निवेदनही ग्रामस्थांनी दिले होते. जळगाव पंचायत समितीचे गटविकासअधिकारी व विस्ताराधिकारी ढाके यांनी १८ नोव्हेंबर रोजी चौकशी संदर्भात वराड बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये आले असता त्यांना दप्तर आढळून आले नाही. याबाबत गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला अद्यापपर्यंत कुठलीही नोटीस किंवा लेखी खुलासा मागविला नाही. तसेच ग्रामसेवक बबन वाघ यांची बदली केल्यानंतर नवीन आलेले ग्रामसेवक तायडे यांच्याकडे पदभार दिल्यानंतरही दप्तर मिळालेली नसून ते गायब आहे. या दोन्ही ग्रामसेवक यांनी मिलीभगत आहे. यावर विस्ताराधिकारी टाके यांना विचारणा केली असता त्यांनी देखील उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे दप्तराची सखोल चौकशी होऊन ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, नाहीतर जळगाव पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर अनिल सपकाळे, नितीन जाधव, ईश्वर जाधव, अर्जुन सुरडकर आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

 

Protected Content