आधारशी लिंक नसलेले पॅनकार्ड एप्रिलनंतर निष्प्रभ

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  ज्यांचे  पॅन कार्ड आधारशी जोडलं  नाही त्यांचे पॅनकार्ड १ एप्रिलपासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल.

 

आधार आणि कायमस्वरुपी खाते क्रमांक अर्थात पॅनकार्ड सध्या सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. याशिवाय तुम्ही बँक खातंही उघडू शकत नाही ना कुठलीही महत्त्वाची कामं करू शकत. अशात पॅनकार्ड आणि आधारविषयी नवीन माहिती समोर आली आहे. पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा.

 

एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. हल्ली इनकम टॅक्स रिटर्न  दाखल करण्यासाठी, पॅनसह आधार क्रमांक देणंसुद्धा आवश्यक असणार आहे.  त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

 

 

 

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ३१ मार्चनंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम २७२ बी अंतर्गत १० हजार  रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे करदात्यांनी ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.

 

तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती.  वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

Protected Content