मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशीनिमित्त आज आदिशक्ती संत मुक्ताई मंदिरात तब्बल सव्वा क्विंटल खजुराची आरास करण्यात आली आहे.
श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी मुक्ताईनगर मूळमंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या शेतातील खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली आहे. आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री संत मुक्ताई मुळमंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा दर्शनासाठी लागल्या असून यात खजुराची आरास भाविकांया आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.
दरम्यान, आज पहाटे संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली. जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही ते मुक्ताई दर्शनातच पांडुरंगाचे दर्शन घेतात अशी ख्याती आहे त्यामुळे दिवसभर हजारो भाविक दर्शनाकरिता येतील असा अंदाज आहे. यातच सकाळी पाऊस आल्याने भाविक दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला आहे. भाविकांसाठी परिसरात सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, दुपारी प्रवचन कीर्तन आणि रात्री हरिजागर आदी कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.