जळगाव प्रतिनिधी । श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था व राष्ट्रीय आदिवासी कोळी संघटना जळगाव तसेच कोळी महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते उत्साहात पार पडला.
श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था व राष्ट्रीय आदिवासी कोळी संघटना जळगाव तसेच कोळी महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा मा.ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. रावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा आयोजक मा.श्री.मुकेशभाऊ सोनवणे, रावसाहेब पाटील, नामदेव सोनवणे गुरुजी, व्ही.टी.नाना सोनवणे, रामचंद्र सोनवणे, राजु सोनवणे, संदीप कोळी, संतोष सोनवणे, राजु जाधव आदी उपस्थित होते. ज्या वधु-वरांची नोंदणी केली असेल यांनी उमेश बिल्डर अॅण्ड डेव्हल्पर्स, विसनगी नगर, डॉ.पराग चौधरी हॉस्पीटल शेजारी, जळगाव येथे येऊन पुस्तक घेवून जावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.