बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे नुकतीच उध्दव ठाकरे यांची शेतकरी संवाद मेळावा घेण्यात आला. या प्रत्युत्तर देतांना खा. प्रतापराव यांनी तोफ डागत अदित्य ठाकरे यांचा शिवसेनेशी संबंधच काय असे खडा सवाल केला आहे.
ते पुढे म्हणाले की, जे आदित्य ठाकरेचे वय 30 ते 32 वर्ष असताना आम्ही जवळपास 36 ते 37 वर्ष शिवसेनेने करता वाहून घेतले आहे. आदित्य ठाकरेला थोडी जरी वाटत असेल. पण शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून आमदार झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांची घोषणा होती. माझे कुटुंब माझी जबाबदारी असे म्हणत आपल्या कुटुंबातील आदित्यला पुढं आणलं. आदित्यला निवडून देण्यासाठी दोन जणांना विधान परिषदेचं आमदार करावं लागलं. पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीतून निवडून आल्यानं त्यांचा राजीनामा द्यावा. मग, लोकांना सांगत फिरावं, असा सल्ला प्रतापराव जाधव यांनी दिला. एकंदरीत उध्दव ठाकरे यांच्या झालेल्या सभेनंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या दोन्ही बाजूंकडून समोर येताना दिसत आहे.