टोकिया वृत्तसंस्था । येथे सुरू असलेल्या ऑलिंपीकमध्ये भारताच्या आदिती अशोक या खेळाडूने महिला गोल्फ या प्रकारात शेवटपर्यंत झुंज देऊनही ती अपयशी ठरली. मात्र तिने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कालचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला होता. भारतीय महिला हॉकी संघाने अतिशय निकराची लढत देऊन सुध्दा कांस्य पदक मिळवता आले नाही. तसेच बजरंग पुनीया हा देखील अंतीम फेरीत जाण्यास अयशस्वी ठरला. या पार्श्वभूमिवर आज महिला गोल्फचा अंतिम सामना खेळविण्यात आला. यात पाऊस सुरू झाल्याने काही काळ खेळ थांबविण्यात आला होता. नंतर मात्र खेळ सुरू झाला.
यात आदिती अशोक या भारतीय खेळाडूने अतिशय उत्तम कामगिरी करत आघाडी घेतली. तिने पहिल्यांदा तिसरा तर यानंतर दुसर्या क्रमांकावर झेप घेतली. ही आघाडी कायम राखण्यात मात्र तिला अपयश आले. ती चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. यात अमेरिकेच्या नेली कोर्डा हिला सुवर्ण, जापानच्या मोनी इनामीला रौप्य तर न्यूझीलंडच्या लोडिया को हिला कांस्यपदक मिळाले.