Home Cities जळगाव शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा शिक्षण सभापतींच्या हस्ते गौरव

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा शिक्षण सभापतींच्या हस्ते गौरव

0
120

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर विजय शांतीलाल पवार यांना शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

 

कोरोना काळात शिक्षकांसाठी ऑनलाईन अध्यापन तंत्रांचे प्रशिक्षण व डिजिटल बुक उपक्रम आयोजनाबद्दल झालेल्या या सत्कार समारंभात सभापती रवींद्र पाटील, सदस्य पोपट भोळे, रवींद्र नाना पाटील, प्रमिला पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे आदी उपस्थित होते. त्यांच्या या सत्काराबद्दल शिक्षणाधिकारी बी. जे.  पाटील, शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे, विविध शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound