पारोळा : प्रतिनिधी । येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपयांचा धनादेश येथील तहसीलदार अनिल गवांदे यांचेकडे आज सुपुर्द केला
वर्षभरापासून देशासह महाराष्ट्र राज्यावरही कोरोना महामारीचे संकट ओढवले असून सध्या ते अधिकच गंभीर झाले आहे.को्रोना बाधितांवर उपचार, प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण, फवारणी जनजागृती/प्रबोधन इत्यादी बाबतीत शासनासह. प्रशासनातील सर्व घटक स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य पोलीस व स्वयंसेवी संस्था देखील आपापल्या परीने मेहनत घेत आहेत.
या संकट निवारण कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपयांचा धनादेश येथील तहसीलदार अनिल गवांदे यांचेकडे सुपुर्द करुन पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली.तालुक्यातून अशी स्वेच्छेने मदत करणारे पहिले नागरिक म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावसार सरांचे अभिनंदन केले आहे
भावसार सरांनी आतापर्यंत पंतप्रधान सहाय्यता निधीत ५० हजार रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही ५२ हजार रुपये मदत केली आहे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम देखील ते नियमितपणे स्वखर्चाने राबवत असतात