Home धर्म-समाज आदर्श शिक्षक भावसार यांना २६ वे कोरोना योद्धा सन्मानपत्र

आदर्श शिक्षक भावसार यांना २६ वे कोरोना योद्धा सन्मानपत्र

0
44

पारोळा प्रतिनिधी | शहरातील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना पुणे येथील जिविका फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेतर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र ऑनलाईन प्रदान करण्यात आले.

 

कोरोना बाधितांसाठीच्या तन-मन-धनाच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हे सन्मानपत्र सदानंद भावसार यांना देण्यात आले. भावसार सरांना यापूर्वी २५ कोरोना योद्धा सन्मानपत्रे मिळाली असून हे २६ वे सन्मानपत्र आहे. भावसार सर आज ७५ व्या वर्षी देखील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून समाजोपयोगी उपक्रम व्यक्तिश: स्वखर्चाने राबवत असतात. यशवंत विद्यार्थी व गुणी जनांचा सत्कार करुन बक्षिसेही देत असतात. यामुळेच एक गुणग्राहक व उपक्रमशील व्यक्तिमत्त्व त्यांची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.


Protected Content

Play sound