जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशाव्दाराजवळ अंगावर डिझेल ओतून केबल व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याी घटना गुरुवार, २९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली होती. या केबल व्यावसायिकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारोळा येथे राजीव गांधी नगरात राहूल देवीदास सरदार वय ४० हे वास्तव्यास आहेत. राहूल सरदार यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले, याठिकाणी प्रवेशाव्दाराजवळ अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, सरदार यांनी धक्काबुक्की करुन पोलीस अधीक्षक कार्यालया बळजबरीने कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, याप्रकरणी सहाय्यक फौजदार प्रकाश मेढे यांनी दिलेल्या फियार्दीवरुन राहूल देवीदास सरदार या केबल व्यावसायिकाविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मीरा देशमुख ह्या करीत आहेत.