आता भारतीयांच्या हाती अमेरिकेचा लगाम”

 

 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा भारतीय वंशाच्या व्यक्तींवर विश्वास असल्याचे चित्र  आहे. ५० दिवसांत बायडेन यांनी महत्वाच्या पदांवर ५५ हून अधिक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची नियुक्ती केली आहे. बायडेन यांनी अमेरिकेचा लगाम भारतीयांच्या हाती असल्याचेही म्हटले  आहे.

 

 

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या एका कार्यक्रमामध्ये बायडेन यांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

बायडेन यांनी मंगळावर पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या ऐतिहासिक लॅण्डींगसंदर्भात नुकतीच नासाच्या संशोधकांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये नासाच्या मंगळ मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय वंशाच्या संशोधक स्वाति मोहनसुद्धा सहभागी झाल्या होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी  स्वाति मोहन , माझ्या उपराष्ट्राध्यक्ष (कमला हॅरिस), माझे भाषण लिहीणारे (विनय रेड्डी),” अशी यादीच वाचून दाखवली.

 

या ५५ लोकांच्या यादीमध्ये उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि नीरा टंडन यांचा समावेश नाहीय. टंडन यांनी व्हाइट हाउस ऑप मॅनेजमेंट अ‍ॅण्ड बजेटच्या निर्देशक पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. पहिल्यांदाच अमेरिकन प्रशासनाच्या कामामध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

 

अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळामध्येही अनेक भारतीय अमेरिकन नागरिकांना प्रशासनामध्ये सहभागी करुन घेण्यात आलं होतं. मात्र ओबामा प्रशासनापेक्षा बायडेन यांनी अधिक भारतीयांची नियुक्ती करत नवा इतिहास रचलाय. काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळामध्ये भारतीयांना प्रशासकीय नियुक्त्यांमध्ये फारशी संधी मिळाली नाही. मात्र ट्रम्प हे असे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आणि कॅबिनेट दर्जाच्या पदांवर भारतीय अमेरिकन नागरिकांना नियुक्त केलं होतं.

 

बायडेन यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय वंशाच्या माजू वर्गीस यांना आपल्या उप सहाय्यक आणि व्हाऊट हाऊस लष्करी कार्यालयाच्या  निर्देशकपदी नियुक्त केलं. यापूर्वी वर्गीस हे बायडेन यांच्या निवडणुक प्रचारामध्ये आणि शपथविधी सोहळ्यातील आयोजन करणाऱ्या सदस्यांच्या गटाचा भाग होते. दिवसोंदिवस बायडेन यांच्या प्रशासनामध्ये भारतीयांची संख्या वाढताना दिसत आहे.

Protected Content