आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खडसेंच्या निषेधार्थ शिवतीर्थ मैदानात राष्ट्रीय बंजारा परिषदेच्यावतीने आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने शहरातील शिवतीर्थ मैदानात रविवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जोरदार आंदोलन करण्यात आले. एकनाथराव खडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर शहरातील मार्केट कमिटी येथे राष्ट्रवाी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्ती जाती जमाती समाजाचा मेळाव्याचे आयोजन गुरूवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने खळबळ उडाली होता. त्यांनी सांगितले की, निवडणूकीच्या काळात बंजारा समाज दोन किलो मटन आणि दारूची बाटली अशी उपमा दिली. खडसेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी, आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.

शिवतीर्थ मैदानावर रविवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव जिल्ह्यातील बंजारा समाजा एकवटले होते. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे समाज सचिव निलेश चव्हाण, बंजारा समाजाचे नेते रमेश नाईक, रामकिसन नाईक, बाळू चव्हाण, उदल नाईक, मनोज जाधव, भाईदास चव्हाण, गोपाल नाईक, देविदास चव्हाण, मेघराज नाईक, लालचंद चव्हाण, अर्जुन जाधव, विकास तवर, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाग २

Protected Content