आंबे वडगाव येथे युवा फाऊंडेशनतर्फे १५ गावात सॅनिटायझर व मास्कचे वाटप

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील आंबे वडगाव येथील विजय दादा युवा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय राठोड यांनी परीसरातील १५ गावामधे पाच प्रशिक्षित युवकांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या जनजागृती सोबत गावातील सतत वर्दळ आसलेल्या चौका – चौकात दोन पंपाद्वारे परीसर सॅनिटायझर करणे, संपूर्ण गावातील नागरिकांना सॅनिटायझर व मासचे वाटप करण्यात येणार असल्याचे विजय राठोड यांनी सांगितले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी विजय राठोड यांनी त्यांच्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा बाबा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविले होते. त्यानंतर आता शनिवारी व रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून बिल्दी, साजगांव, सांगवी प्र. लो., नाईकनगर, कुऱ्हाड खु”, कुऱ्हाड बु”,  रामेश्वर,  म्हसास, लोहारा, कासमपूरा, शहापूरा, कळमसरा, आंबेवडगाव, कोकडी, जोगे तांडा, आंबेवडगाव (तांडा), आंबेवडगाव, लाखतांडा, वरखेडी, भोकरी, सार्वे जामने या गावात दोन दिवस कोरोना व्हायरस बाबत जनजागृती करुन गावातील वर्दळीच्या ठिकाणे सॉनिटायझरींग करणे, मास्क व सॅनिटायझर वाटप करुन कोरोना व्हायरसची साकळी तोडण्यासाठी सोशल डिंस्टंन्सचे पालन करणे, मास लावणे, नियमित हात धुणे या विषयावर पाच पाच युवकांचे दोन गृप तयार करून जनजागृतीची केली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावातील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का. सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, तलाठी, कोतवाल यांनी सहकार्य करण्याचे आवाहन विजय राठोड यांनी केले आहे.

Protected Content