आंध्र प्रदेशात आता राज्य लोक सेवा आयोगाकडून उमेदवारांना मुलाखतीशिवाय नेमणूक

 

हैदराबाद : वृत्तसंस्था । आंध्र प्रदेश सरकारने गट -१ सेवांसह सर्व विभागांतर्गत असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.

 

आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेमध्ये सरकार पारदर्शकता आणू इच्छित आहे. यासाठीच काळजीपूर्वक तपासणी करून एपीपीएससी परीक्षांची मुलाखत प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. शनिवारी आंध्र प्रदेशचे प्रधान सचिव आदित्यनाथ दास यांनी ही माहिती दिली.

 

यापूर्वी, राज्य सरकारने २०१९ मध्ये गट -१ वगळता विविध पदांसाठी मुलाखती न घेण्याचा निर्णय घेतला होता, ज्यात पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी आणि उपायुक्त या पदांचा समावेश होता. एपीपीएससीने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत गट -१, गट -२ आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसह सर्व भरती परीक्षांसाठी मुलाखती रद्द करण्याचा प्रस्ताव दिला होता.

 

 

त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता, सरकारने आदेश जारी केल्यावनंतर गट -१च्या पदांसह आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांची मुलाखत पद्धत रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवारांना संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये पूर्ण विश्वास आणि पारदर्शकता वाटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.

 

दरम्यान, हा नियम शनिवार नंतर देण्यात आलेल्या भरती अधिसूचनेवरच लागू होईल असे सरकारचे प्रधान सचिव यांनी सांगितले. “संपूर्ण निवड प्रक्रियेतील प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पूर्ण आत्मविश्वास मिळवणे हे या निर्णयाचे उद्दीष्ट आहे. या निर्णयानंतर, गट १, गट २ आणि इतरसारख्या लोकप्रिय परीक्षांसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. हा नवीन नियम शनिवारी आणि त्यानंतर जारी केलेल्या सर्व एपीएससी भरती परीक्षांसाठीच लागू असेल असेल,” असे त्यांनी सांगितले

 

Protected Content