१५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न

 

पुणे : वृत्तसंस्था ।  १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.” अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

 

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी   संवाद साधला.

 

यावेळी उदय सामंत म्हणाले, “सध्या राज्यातील विद्यार्थी आणि पालक यांना महाविद्यालयाकडून होणार्‍या शुल्काच्या मागणीचा विचार करिता, त्या दृष्टीने निवृत्त न्यायाधीश खासगी संस्थासाठी एफआरए निर्णय घेणार आहेत. यासाठी विजय आचलायी हे अध्यक्ष आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाची सीईटी ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. मात्र जोपर्यंत बारावीचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीईटीचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही.”, असे त्यांनी सांगितले.

 

काही दिवसांपासून पुण्यात प्राध्यापकांनी आंदोलन सुरू केले होते. ते आता मागे घेतले असून पुढील आठवड्यात राज्यात ३ हजार ७४ पदांची भरती होणार आहे. या भरती संदर्भात येत्या दोन दिवसांत वित्त विभाग आणि अजित पवार निर्णय घेतील.” अशी देखील यावेळी उदय सामंत यांनी माहिती दिली.

 

Protected Content