भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील संत सेना नाभिक समाज कार्यालयात आयोजित मेळाव्यात जळगाव येथील देविदास फुलपगारे यांची अखिल भारतीय जिवा सेना युवक प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सोमवार दि. २७ जून रोजी आयोजित मेळाव्यात प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी व जिल्ह्यातील जिवा सेनेचे पदाधिकारी सोबत जिल्ह्यातील समाज बांधवांच्या उपस्थितीत राष्ट्रीयअध्यक्ष गोविंद पिंपळगावकर , राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजकुमार गाजरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव साहेबराव शेळके यांच्या आदेशान्वये विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, सुधीर महाले, जिल्हा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी , जिल्हा सचिव प्रा.डॉ नरेंद्र महाले, भुसावळ शहरातील सचिन उर्फ बंटीभाऊ सोनवणे, महिला जिल्हा अध्यक्ष कोकिळा चित्ते, भुसावळ महिला तालुकाध्यक्ष अनिता आंबेकर, भुसावळ येथील पंडित दादा (गुरुजी) बोरणारे आदी उपस्थित होते.
यावेळी देविदास फुलपगारे यांची अखिल भारतीय जिवा सेना युवक प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच जळगाव जिल्हा अध्यक्षपदी यावल तालुक्यातील न्हावी येथील किशोर राजाराम श्रीखंडे यांची व जिल्हा सचिवपदी प्रा. डॉ. नरेंद्र महाले यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली. यासोबत कर्मचारी जिल्हा अध्यक्षपदी अनिल जगताप, कर्मचारी जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिल चौधरी, युवक जिल्हाध्यक्षपदी अनिल टोगे, कर्मचारी जिल्हा सचिव संतोष रेलकर, जिवा सेना जिल्हा कार्याध्यक्षपदी गणेश शेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश झुरके, राहुल जगताप यांची निवड करण्यात आली.
जिल्हा समन्वय समिती प्रमुख सुरेश ठाकरे यांची निवड करण्यात आली. युवक जिल्हा उपाध्यक्षपदी मनोज सूर्यवंशी ,प्रवीण हातकर, जिवन बोरनारे यांची रावेर तालुका अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. उमेश निंबाळकर यांची रावेर तालुका*युवक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली , उदय सोनवणे यांची फेर निवड करण्यात आली. भुसावळ तालुका अध्यक्ष भिका बनाईत, जिल्हा संघटक रवी अहिरकर , चोपड्याचे जिल्हा संपर्कप्रमुख दिनेश जगताप यांची फेर निवड करण्यात आली. धरणगाव येथील अमोल महाले यांची फेर निवड करण्यात आली व पुढील पदासाठी स्थानिक तालुकास्तरावर जाऊन तालुकाध्यक्ष व युवकअध्यक्ष व त्या पुढील कार्यकारणीसाठी वरिष्ठ पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्या विचाराने कार्यकारणी निवडण्यात येईल. या अगोदर दिलेली पदे कायम करून काही पदे फेर बदल करून टप्प्याटप्प्याने जिल्हाभर कार्यकारणी निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यात युवकांचे संघटन , महिला संघटन, कर्मचारी संघटन , दुकानदारांच्या समस्या असे बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य, उत्तर महाराष्ट्र, जळगाव जिल्ह्यातून जिवा सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.