अमळनेर, प्रतिनिधी | येथील अॅड. ललिता पाटील स्कूल येथे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त २२ डिसेंबर रोजी मॅथ डे साजरा करण्यात आला.
अॅड. ललिता पाटील स्कूल येथे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मॅथ डे साजरा करण्यात आला. यावेळी रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणितात आवड निर्माण व्हावी म्हणून गणतीय उपक्रमांचे प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच शाळेच्या शिक्षिका अश्विनी चौधरी, चारुशीला पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे शाळेचे संचालक पराग पाटील व प्राचार्य विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त गणिताचे अध्ययन व अध्यापन या संबंधी विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिता पाटील यांनी केले तर पठाण सर यांनी आभार व्यक्त केले.