Home Uncategorized अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण : विद्यार्थ्यांनी नोंदविला ऑनलाईन सहभाग

अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण : विद्यार्थ्यांनी नोंदविला ऑनलाईन सहभाग

0
33

 अमळनेर,प्रतिनिधी । अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे  संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ लाईव्ह काॅन्फरंस च्या सहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना लिंक पाठवून ह्या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले.

 

विद्यार्थ्यांनी स्कुल युनिफॉर्ममध्ये  वेळेवर तयार राहून  ह्या कार्यक्रमात उत्साहात ऑनलाईन सहभाग नोंदविला. स्कुलचा फेसबुकवर अकाऊंट वरुन देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते.सर्वांनी भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणा देत ऑनलाईन पद्धतीने देशभक्तीचा एक अनोखा संदेश दिला.  यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अॅड. ललिता पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीत मनामधे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी सचिव प्रा. शाम पाटील ,संचालक पराग पाटील, देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन शिक्षक वृंद उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound