असोदा सार्वजनिक विद्यालयाचा एसएससी बोर्डाचा निकाल ८८.८० टक्के

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील असोदा येथील सर्वोदय एज्युकेशन सोसायटी संचलित सार्वजनिक विद्यालयाचा एस. एस. सी मार्च २०२० चा निकाल ८८.८० टक्के इतका लागला आहे. यात प्रथम पुरुषोत्तम रविंद्र महाजन(८९.२०), द्वितीय डिगंबर चंद्रकांत पाटील(८७ ) तर मृदुला डिगंबर पाटील ही विद्यार्थानी (८६.६०) टक्के मिळवून तृतीय आली आहे.

 

 

चतुर्थ-१ भाग्यश्री लक्ष्मण चौधरी(८५.२०) तर चतुर्थ २ अक्षदा रविंद्र सोनवणे हिला (८५.२०) टक्के मिळाले आहे. तर पाचवा गुंजन प्रमोद चिरमाडे(८५ टक्के) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विलासदादा चौधरी, चेअरमन उद्धवदादा पाटील, सचिव कमलाकरदादा सावदेकर,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका विद्या खाचणे, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांनी कौतुक केले.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामध्ये योगदान देणाऱ्या शिक्षकांचे संस्था व मुख्याध्यापकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Protected Content