जिल्हास्तरिय युवा स्वयंसेवक पुरस्काराने तेजस पाटील सन्मानित

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाड ग्रामपंचायतचे युवा सदस्य व स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ठ असे प्रचार व प्रसार करणारे तेजस पाटील यांना जिल्हास्तरिय युवा स्वयंसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जळगाव येथे आयोजीत नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा स्वच्छ भारत अभियान जिल्हास्तरीय युवा स्वयंसेवक पुरस्कार नेहरू युवा केंद्राचे यावल तालुका समन्वयक तथा शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांना मिळाला. आझादि का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आला. त्यात यावल तालुक्यातून सर्वात जास्त 3.5 टन प्लास्टिक कचरा संकलन करून जिल्ह्यात सर्वात जास्त स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार व प्रसार तेजस पाटील यांच्या नेतृत्वात झाला.

जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील,जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, एन एस एस डायरेक्टर डॉ पंकज कुमार नंनवरे, एन एस एस नोडल अधिकारी दिनेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी, दिशा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विनोद ढगे, तुळजाई प्रतिष्ठान अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे अल्पबचत भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम यावल तालुक्यात राबविण्यासाठी यावल तालुका तहसीलदार महेश पवार  यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच यावल फॉर्मर प्रोड्युसर कंपनी मधील सर्व शेतकरी बांधव, दत्त ड्रिप,  तालुक्यातील युवा वर्ग व नेहरू युवा केंद्र टीम यांची साथ मिळाली असे तेजस पाटील यांनी सांगितले. तेजस पाटील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रमातून एक वेगळा ठसा उमटविला आहे.  तेजस पाटील यांचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

 

Protected Content