जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील असोदा रेल्वे गेट समोर तरुणाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश प्रकाश हजबन (वय-३८) रा. कला वसंत नगर आसोदा रेल्वे गेट जवळ जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान त्याची मोटरसायकल एमएच १९ बीटी ५६०४ ही दुचाकी अज्ञात चोट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. दुचाकी चोरी केल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरेश आजपण याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला.
परंतु दुचाकी कुठेही आढळून न आल्याने अखेर शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.