जळगाव प्रतिनिधी। निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे माहेर असलेल्या असोदे गावातील विविध रोगराईला आमंत्रण देणारे पिण्याचे पाणी अत्यंत घाण फिल्टर न झालेले येत असल्याबद्दल असोदा ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून संतापही व्यक्त होत आहे.
तर काही सुजाण नागरिकांनी या अस्वच्छ व पिण्यालायक नसलेल्या पाण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात यावी असा उपरोधात्मक टोला ही लगावला आहे.दरम्यान असोदा ग्रामपंचायत करते तरी काय ? ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा काय अधिकार ? असा सूरही जेष्ठ नागरिक व महिलांमध्ये उमटत आहे.लवकरात लवकर स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.