अश्लिल व्हिडीओ व्हायरलची धमकी देत ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका ३२ वर्षीय तरुणाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी करत १ लाख ३९ हजार ७४० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञान मोबाईलधारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भुसावळ येथील ३२ वर्षीय तरुण हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान २१ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत त्याला अनोळखी व्हाट्सअप क्रमांकावरून फोन आले. त्याने क्राइम ब्रांच व youtube मधून अधिकारी बोलत असल्याचे भासवून तरुणाचे नकळत असतील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले. त्यानंतर हा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियात व्हायरल करून देण्याची धमकी तरुणाला देण्यात आली. सोशल मीडियावर रेकॉर्डिंग व्हायरल न करायची मोबदल्यात तरुणाला १ लाख ३९ हजार ७४० रुपयांची वेळोवेळी खंडणी मागून ऑनलाइन पद्धतीने पैसे मागून घेतले. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने बुधवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईलधारका विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

 

 

 

Protected Content