भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बकरी चारून त्या आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २५ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महिला शेतातून चारा आणत असतांना त्यांच्या गावात राहणारा प्रकाश पंढरीनाथ पवार याने महिलेचा रस्ता आडविला. तिची साडी ओढून अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तातडीने रात्री १० वाजता भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रकाश पंढरीनाथ पवार याच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत आहे.