गिरणा नदीतून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर पोलीसांनी कारवाई केली आहे. वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले असून धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणानदीपात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याच्या पोलीसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी २५ मार्च रोजी सकाळी १० वाजता धरणगाव पोलीसांनी धडक कारवाई करत वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रक्टर क्रमांक (एमएच १९ बी ०१०६) बांभोरी गावातील स्मशानभूमीजवळ पकडले. वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी वाळूचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक नितीन सुरेश कोळी (वय-२७) रा. बांभोरी ता. धरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.

Protected Content