अवैध धंद्यांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन छेडू : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इशारा (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतुक,ओव्हर लोडींग वाहतुक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महानगरतर्फे जिल्हाधिकारी यांना महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतुक, ओव्हर लोडींग वाहतुक यांचेवर कारवाई का होत नाही. गेल्या चार महिन्यापासून जळगांव जिल्ह्यातील वाळू उपसा करणारे नदी किनाऱ्यावरील वाळू उपसा करण्याकरीता संघटीतपणे कामाला लागले आहे. ज्या ठिकाणी व ज्या प्रकारे नियमानुसार मक्ते देण्यात येतात त्या प्रमाणे ही उपसा करण्यात येत नाही. अशा प्रकाराने पर्यावरणाचा हास होत आहे. एवढे सर्व असूनही महसुल विभाग, पोलीस विभाग, परीवहन विभाग यांच्या दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतुक, ओव्हर लोडींग वाहतुक होत आहे. कारवाई झाली तर थातुर मातूर कारवाई करून सोडून देण्यात येते. वाहन मालकावर कोणतीही कारवाई महसुल विभागाकडून होत नसल्याने अवैध रेती उपसा करणारे वाहनधारक बेदरकार प्रमाणे वाहने पलवितात. त्यांच्या या कृत्याने जळगाव जिल्हात शहरातही मोठ्या प्रमाणात वाहनाल्या भडकेने अनेक निष्पाप नागरीक बळी पडलेले आहे पण या अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतुक, ओव्हर लोडींग वाहतुक करणाऱ्यांवर कोणतीही कडक कारवाई आज पावेतो झालेली नाही दि.२४ नोव्हेंबर रोजी तरसोद फाटा येथे एका महिलेचा दि.२५ नोव्हेंबर रोजी के.सी.पार्क, शिवाजीनगर येथे दोन व्यक्तींचा नाहक बळी या वाहनाच्या अपघातात झालेला आहे. सदर अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतुक, ओव्हर लोडींग वाहतुक करणारे यांची संघटीत गुन्हेगारी पद्धत अवलंबवित असुन या वाळू उपसा करणाऱ्यांचे मनोधैर्य दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतुक, ओव्हर लोडींग वाहतुक करणाऱ्यांवर कडक कारवाई झाल्यास निश्चितच आळा बसेल. प्रत्येक वेळेस निवेदन देवुन सुद्धा कारवाई करण्यास दुर्लक्ष केले जात आहे. तरीही मागील काही महिन्यात ह्या गोष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवाराची जबाबदारी आपण घ्यावी. अन्यथा अतिशय गंभीर परिणाम व जनआंदोलनास आपणास सामोरे जावे लागेल. तरी अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, अवैध वाहतुक, ओव्हर लोडींग वाहतुक यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी महानगर (जिल्हा) महानगर तर्फे करण्यात आली. याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपुत, राजु मोरे, सुशील शिंदे, जितेंद्र बागरे, विशाल देशमुख, नईम खाटीक, गोटू चौधरी, अकिल पटेल, भगवान सोनवणे, रमेश बहारे, डॉ. रिजवान खाटीक, रहिम तडवी आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1249252125567212

 

Protected Content