यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील अवैध धंदे पोलिसांनी तात्काळ बंद करावे या मागणीसाठी यावल तालुका मनसेने महिलांच्या सहभागासह आंदोलनाचा इशारा दिला आहे
तालुक्यात सर्वत्र कोरोना विषाणु संसर्गाचा कहर सुरू असतांना या संकटकाळात अनेक नागरीकांचा मृत्यु ओढवला जात आहे . असे असुन देखील यावल शहरात व तालुक्यात सर्वत्र संचारबंदीचे नियम धाब्यावर ठेवुन सर्व अवैध धंदे मात्र सर्रास सुरू आहेत अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस स्टेशन समोर महीलांच्या सोबतीने विना पैशांचे पत्ता जुगार खेळण्याचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मनसेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांना पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , कोरोना महामारी या संकटकाळात ही यावल शहर व तालुक्यात खुल्ले आम सट्टा मटका , जुगार पत्त्याचे अड्डे , दारूची सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे जुगार अड्डयांवर तसेच सट्टा मटका तथा खुल्ले आम होत असलेल्या दारू विक्रीमुळे या ठीकाणी मोठया प्रमाणावर गर्दी जमतांना दिसुन येत आहे . या सर्व प्रकारामुळे जिल्हाधिकारी यांनी घातलेल्या संचारबंदीच्या कड़क निर्बंधाची पायमल्ली होतांना दिसुन येत असल्याचे चेतन अढळकर यांनी म्हटले आहे तात्काळ सर्व राजरोसपणे सुरू असलेली अवैध धंदे पोलीसांनी बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन यावल पोलीस स्टेशन समोर महिलांच्या मदतीने विना पैशांचे जुगार पत्ता खेलो आंदोलन करण्यात येईल , आंदोलना ठीकाणी उद्धभवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितिला प्रशासन जबाबदार असेल .