मुक्ताईनगरात संचारबंदीवर पोलीसांची करडी नजर (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । जिल्ह्यात कडक लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणारे आणि संचारबंदीवर मुक्ताईनगर पोलीस कर्मचारी करडी नजर ठेवून कारवाई करत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. 

सविस्तर असे की,  जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारपासून जिल्ह्यात कडकब लॉकडाऊन राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज दुसऱ्या दिवशी मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार व तहसीलदार श्वेता संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्यावर कडक नजर ठेवण्यात येत आहे. 

मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार,  पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलीस कर्मचारी मोजेश पवार यांच्यासह होमगार्ड, नगरपंचायतचे  दिपक जग्रवाल, कर्मचारी सुरेश अलोणे, गणेश कोळी, सुनील चौधरी, मयूर महाजन यांनी  शहरांमध्ये फिरून जे काही अत्यावश्यक सेवा मध्ये येणारे दुकाने आहेत त्यांची तपासणी करून माहिती घेण्यात आली.

Protected Content