अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात सुरू असलेले अवैध धंदे कायमचे बंद करावे, या मागणीसाठी शेंदुर्णी येथील शेतमजूर अनिल पाटील यांनी मंगळवारी २४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हाधिकार अमन मित्तल यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेंदुर्णी गावात असलेल्या मंदिरे, मश्जिद, जिल्हा परिषद शाळा, नवीन बसस्थानक तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर अशा ठिकठिकाणी अवैधरित्या सट्टा व जुगाराचे अड्डे सुरू आहेत. दरम्यान गावातील आठवडे बाजारात देखील रोहिदास महाराज मंदिराच्या लागून देखील जुगाराचे अड्डे गावातील गुंड चालवत आहे. हा प्रकार पोलिसांना हाताशी धरून आमच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दमदाटी केले जात आहे. भर दिवसादेखील धार्मिक मंदिर, मश्जिद तसेच मराठी मुलांची शाळाच्या बाजूला जुगाराचे अड्डे सुरू असल्यामुळे याचा त्रास महिलांना होत आहे. तसेच महिलांना या संदर्भात अपमानास्पद वागणूक मिळत आहे. शेंदुर्णी गावात गेल्या ६ महिन्यांसाठी हद्दपार असलेले सागर सुभाष ढगे, शरद बाबुराव आसवार, शुभम गजानन गुजर, विकी सुभाष ढगे, गोविंद अमृत बारी यांना सहा महिन्यासाठी पोलीसांनी हद्दपार केलेले आहे. तरी देखील गावात सागर सुभाष ढगे याचे सट्टा जुगार याचे धंदे सुरू आहे. तरी प्रशासनाने याची दखल घेवून गावातील अवैधधंदे बंद करून गुंडांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा अनिल पाटील यांनी केला आहे.

 

Protected Content