रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वन खात्याने अवैध डिंकाच्या विरोधात सुरू असलेली कारवाई कायम ठेवत ९० किलो डिंक पुन्हा धडक कारवाई करून जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
वन विभागातुन सुरु असलेल्या अवैध डींक विरुध्द रावेर आरएफओ अजय बावणे यांचे वॉश आऊट सुरुच आहे. काल रात्री दोन वाहनांवर कारवाई करून सुमारे ५३ हजार रुपयांचा ९० किलो डींक जप्त केला आहे.
पहीली कारवाई गुप्त बातमी नुसार वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांनी सापळा रचून पिपरकुड ते निमड्या रस्त्याने अवैध गौण वनउपज (धावडा डिंक) वाहतूक करणारे ०२ मोटार सायकल यांच्या पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत आरोपी मोटरसायकल सोडून फरार झाले. या कारवाईत मोटरसायक क्र. एम एच १९ डि सी ८०८ व एम एच १९ यु ०१७८ किंमत -५०,०००/ रुपये धावडा डिंक ६० किलो २०,००० /-रु एकूण ७०,०००/-रु किंमतीचा मुद्देमाल मु्देमाल भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(ब)४२ ५२ प्रथम रिपोर्ट क्रमांक-१/२०२३ दिनांक ४/३/२०२३ अन्वये जप्त केला.आहे.
तर दूसरी कारवाई पहाटे नियतक्षेत्र जिन्सी कक्ष क्र. १० मध्ये गस्त करीत असता अवैध गौण वनउपज ( सलई डिंक) वाहतूक करणारे १ मोटार सायकल हिरो एम पी ६८ एम ई ६३२२ मोटरसायकल किंमत ३००००/- सालई डिंक ३० किलो किंमत- ३३,३००/- मुद्देमाल भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(ब)४२ ५२ अन्वये वनरक्षक जिन्सी प्रथम रिपोर्ट क्रमांक-०२/२०२३ दिनांक ४/३/२०२३ चा नोंदवून जप्त केला.
या प्रकरणी आरोपी नामे मांगीलाल शेरसिंग मेहता वय-३५ रा.धुलकोट पोस्ट नेपानगर जिल्हा बर्हाणपूर (म.प्र) यास चौकशी करण्यात येत आहे सदर कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे वनपाल रवींद्र सोनवणे, अरुणा ढेपले.वनरक्षक रमेश भुतेकर सुधीर पटणे सविता वाघ. वाहन चालक -विनोद पाटील यांनी संयुक्त रित्या कार्यवाही केली.पुढील तपास वनपाल अहिरवाडी करीत आहे.