जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काही दिवसांपूर्वी विद्यापीठाकडून ४० ते ७३% टक्यांनी भरमसाट शुल्क वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठाने अवाजवी शुल्कवाढीबाबत घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनतर्फे कुलगुरू यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, विद्यापीठामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार क्षेत्रातील आदिवासी शेतकरी हातावर पोट भरणाऱ्या वर्गातून येणारा विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यापीठा मार्फत वाढवल्या जाणाऱ्या फी आणि ते ही इतक्या प्रमाणात वाढवला जाणारे शुल्क हे खूप जास्त आहे. तरी समाजातील तालुक्यातील खेड्यातील शेवटचा घटकातील वर्गातील विद्यार्थीची आर्थिक समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना परवडेल असे असावे. तसेच फी वाढीचा घेतलेला निर्णय हा तात्काळ मागे घेण्यात यावा ही व फी वाढीचा निर्णय येत्या १५ दिवसात मागे न घेतल्यास पुढील १५ दिवसांच्या नतंर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतिने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने कुलगुरू यांना निवेद्नानाद्वारे देण्यात आला आहे. यावर कुलगुरू डॉ. महेश्वरी यांनी लवकरच म्हणजे तीन दिवसांत या समस्येवर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी मासूचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन व पदाधिकारी पवन पाटील,सागर पाटील,प्रथमेश मराठे,गायत्री सपकाळे, आदिती केळकर आदी उपस्थित होते.