जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील समता नगर भागात १७ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता मुलगी घरी असताना घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनिवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.