जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात अल्पवयीन १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. याच परिसरात तरुण राहतो. सोमवारी अल्पवयीन मुलगी कचरा फेकायला गेली असता, मुलीला तरुण त्याच्या घरात ओढून घेवून गेला. माझ्यासोबत प्रेम करावे लागेल असे सांगून तरुणाने मुलीला दिवसभर घरात बसवून ठेवले. त्यानंतर तिच्यासोबत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच मुलीला धमकावून भिती निर्माण केली. हा प्रकार समोर आल्यानंतर मुलीच्या आईने मंगळवारी याबाबत रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाळ देशमुख करीत आहेत.