अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहिवद गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवार १ जून रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील दहिवद गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आई-वडील व भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान नातेवाईकांकडे लग्न असल्या कारणामुळे पीडित मुलीचे आई-वडील हे मध्यप्रदेश येथे निघून गेले होते. त्यावेळी पीडित मुलगी व तिचा भाऊ घरीच होते. दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला समजले की, पीडित मुलगी घरात नाही, त्यामुळे त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, “तुमची मुलगी दिसत नाही” त्यावरून पिडीत आई-वडील हे तातडीने मध्यप्रदेशातून दहिवद येथे आले. त्यांनी नातेवाईक तिचे मैत्रिणी व इतर गावांमध्ये शोध घेतला असता तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर गुरुवार १ जून रोजी रात्री ८ वाजता पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.