अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून संपविले जीवन !

 

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील आझाद नगरातील रहिवाशी श्रावण लक्ष्मण कोळी (वय ५५) यांनी सततची नापिकीला आणि कर्जबाजारीला कंटाळून विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली.

 

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे श्रावण लक्ष्मण कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी १८ एप्रिल रोजी गुराढोराला चारा पाणी करून घरी आले व घरी आले असता अचानक त्यांना चक्कर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आले.  त्यांनी तात्काळ श्रावण लक्ष्मन कोळी यांना खाटीवर टाकले असता त्यांना उलट्या होत असल्याने त्यांनी काही तरी विषारी औषध सेवन केले असल्याचे लक्षात येताच लागलीच ग्रामस्थांनी मोठा मुलगा योगेश यास फोनवर माहिती देऊन घरी बोलवले व श्रावण कोळी यांना तातडीने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. १९ एप्रिल रेाजी सकाळी १० वाजता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

श्रावण कोळी यांनी अशा प्रकारे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या कुंटूबावर आभाळच कोसळले आहे.  लक्ष्मण कोळी हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी आपल्या शेतीसाह इतर शेती बटाईने करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत संसाराचे गाडे हाकत होते. मात्र मागील दोन तीन वर्षापासून कस्ट करूनही लक्षण कोळी यांना मनासारखं उत्पन्न व वारंवार नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान. यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट होतांना दिसुन येत होते तसेच त्यांनी घेतलेल्या कर्जाचे ओझे डोईजड झाल्याने ते बऱ्याच दिवसापासून कर्जबाजारीमुळे हताश झाले होते. पुढील वर्षासाठी शेती तयार करावी  म्हणून पैसा उपलब्ध नसल्याने  व बँके, सोसायटीचे कर्ज कशे परतफेड होईल या विचाराने त्यांनी टोकाची भूमिका घेतली असावी अशे जनतेतून बोलले जात आहे. १८ एप्रील रोजी घरी कोणी नसतांना त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध घेत आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मूल दोन बहिणी, जावाई नातवंड असा परिवार आसून येथील रिक्षा चालक योगेश कोळी यांचे ते वडील होते.

Protected Content