अरेच्चा : एकाच षटकात सात सिक्सर ! : ऋतुराजचा विश्‍वविक्रम

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने एका षटकात तब्बल सात सिक्सर टोलविण्याचा विश्‍वविक्रम केला आहे.

विजय हजारे ट्रॉफीच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात होत आहे. यात ऋतुराज गायकवाड याने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. गायकवाडने एकाच षटकांत ७ षटकार ठोकले आणि ४३ धावा केल्या. डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील ४९ वे षटक टाकत होता. त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. अशाप्रकारे त्याने एकाच षटकात ७ षटकार ठोकले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ बाद ३३० धावा केल्या आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ३०० पार धावसंख्या केली.

Protected Content