Home राजकीय ब्रेकींग : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता

ब्रेकींग : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता

0
34

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लवकरच पदमुक्त होण्याची शक्यता असून या संदर्भात एबीपी-माझा या वाहिनीने वृत्त दिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे एकापाठोपाठ एक केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे टिकेचे धनी बनले आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली असून सोशल मीडियातूनही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. यातच त्यांना हटविण्यात न आल्यास राज्यात बंद पाळण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. या पार्श्‍वभूमिवर, ते पदमुक्त होऊ शकतात असे एबीपी-माझाच्या वृत्तात म्हटले आहे.

या वृत्तानुसार, राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे.


Protected Content

Play sound