जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगर परिसरातील श्री प्लाझा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विजयालक्ष्मी भरत सोनवणे असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अयोध्या नगर परिसरातील हॉटेल कमल प्राईड जवळ असलेल्या श्री प्लाझा अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर १०३ मध्ये विजयालक्ष्मी भरत सोनवणे (वय-६२) ह्या आपल्या पतीसह वास्तव्याला आहेत. त्यांनी आज सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास राहत्या घरात त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान विजयालक्ष्मी भरत सोनवणे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.