Home धर्म-समाज महेश पवार यांनी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार

महेश पवार यांनी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार

0
67


पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा येथील व्यावसायिक महेश पवार यांनी आपला व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळून नुकतीच एल. एल. बी. परिक्षा उत्तीर्ण केली आहे. आज दि. १७ आॅक्टोबर रोजी मा. आमदार स्व. ओंकार (अप्पा) पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त बांबरूड (राणीचे) ता. पाचोरा येथे महेश पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पाचोरा मतदार संघाचे मा. आमदार दिलीप वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, पंचायत समितीचे सदस्य ललित वाघ, विनय जकातदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, सरपंच शशि वाघ, दगाजी वाघ, एम. एम. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, प्रा. डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. शिरीष पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. डॉ. जे. बी. पाटील, प्रा. डॉ. जी. बी. पाटील सह बांबरुड (राणीचे) गावातील व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound