नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची लस तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कोरोना विषाणूंचे ट्रायल अमेरिका, चीन आणि ब्रिटेनमध्ये होत आहे. सुरूवातीला दिसून आलेले परिणाम समाधानकारक असल्याचा दावा हार्वर्ड युनिव्हरसिटीतील तज्ञांनी केला आहे.
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस जगभरात वाढत चालला आहे. कोरोना विषाणूंवर लस शोधली जाण्यासाठी संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. येत्या काळात या लसीचे यशस्वी प्रयोग झाल्यास कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते. या लसीचे क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यानंतर कोरोना विषाणूची लस तयार करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. या चाचणीत सकारात्मक परिणाम दिसून आल्यास २०२१ पर्यंत लस तयार होऊ शकते. सुरूवातीचे परिणाम पाहता लस यशस्वी होत असून २०२१ पर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.