स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण

यावल  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  l तालुक्यातील आमोदे  येथील घनश्याम काशीराम विद्यालयात नुकताच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

 

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे याकरिता विविध स्पर्धां घेण्यात आल्या. गावकरी व संचालक मंडळ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी सावदा येथील साहित्यिक प्रा. व. पु. होले हे अध्यक्षस्थानी होते.  तर फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  सिद्धेश्वर आखेगावकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक व अतिथी परिचय मुख्याध्यापक एस. बी. बोठे यांनी केले.  या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यात साहित्यिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्रा.व. पु. होले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी ‘मी वाचलेले सुंदर वाक्य व माझी चित्ररचना ‘  या दोन फलकांचे विद्यार्थ्यांसाठी सुविचार लिहून प्रा. व. पु. होले यांनी तर  चित्र काढून  पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी सुरुवात करून उपक्रमास सदिच्छा दिल्या. याप्रसंगी सिद्धेश्वर आखेगावकर यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात असल्याचा न्यूनगंड बाळगू नका, यश संपादनासाठी सातत्याने प्रयत्न चालू ठेवा. यश प्राप्त केल्यावर जास्तीची जबाबदारी वाढते. यशात सातत्य असणे गरजेचे आहे असल्याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर किंमत व मूल्य यातील फरक ओळखण्यासाठी होडी  दुरुस्तीचे सुंदर उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना किंमत व मूल्य यातील फरक लक्षात आणून दिला.  प्रत्येकानेच जीवनात एक तरी कौशल्य प्राप्त करणे व त्या कौशल्याचा उपयोग मूल्य वाढीसाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष विनायक पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील, चेअरमन ललित महाजन, संचालक एकनाथ लोखंडे, प्रमोद वाघुळदे, नामदेव पाटील, वैभव चौधरी, सुभाष महाजन,  फौजदार  हेमंत सांगळे उपस्थित होते.बक्षीस निधी वाचन ललित पिंपळकर यांनी केले.   विकास  पाटील  यांनी आभार तर सूत्रसंचालन  ईश्वर  चौधरी  यांनी केले. यशस्वीतेसाठी घ.का. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पाहिलं.

Protected Content