अमृता फडणवीस यांचे ट्वीट चर्चेत : ठाकरे सरकारवर पुन्हा साधला निशाणा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील दोन दिवसांपासून राजकीय वातवरण तापलेले असतांना विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

मागील  दोन दिवसात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिला होता. यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारल्याने राणा दाम्पत्याला माघार घ्यावी लागली. यातच त्यांना अटककरण्यात आली. तर शनिवारी रात्री उशीरा किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेली दगडफेक राजकीय वादासाठी कारणीभूत ठरली. यासर्व पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर नाव न घेता निशाणा साधला आहे. यावर अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्वीट देखील चर्चेत आलं आहे. “बाळासाहेब के नाम पे करते सभी अब रास लीला है, मैं करूं तो साला, कॅरेक्टर ढीला है”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

Protected Content