सुवर्ण महोत्सवी शाळेची माजी विद्यार्थिनी प्रा.पल्लवी सपकाळे यांना पी.एच.डी पदवी प्रदान

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल शाळेची माजी विद्यार्थिनी पल्लवी वसंत सपकाळे यांना नुकतीच पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचे शाळेतर्फे कौतुक करण्यात आले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाशी संलग्न रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नेरुळ नवी मुंबईच्या प्राध्यापिका पल्लवी वसंत सपकाळे यांना इलेक्ट्रॉनिक्स ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये मुंबई विद्यापीठातून ” Enhancing Quality of Service in Mobility Management for next Generation Network ” स्पेशलायझेशन विषयातून पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून डॉ.उत्तम कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

माझ्या यशामागे माझी आई सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगावच्या माजी शिक्षिका संघमित्रा वसंत सपकाळे, वडील सेवानिवृत्त जि.प.शिक्षक वसंत सपकाळे, आणि पती प्रशांत रमेश कांबळे बायोमेडिकल शिलर कंपनी मुंबई येथे मॅनेजर यांचे अनमोल सहकार्य लाभले. माझ्या महात्मा फुले हायस्कूल शाळेने माझ्यावर केलेले संस्कार आणि माझ्या शिक्षकांनी दिलेले शिक्षण यामुळेच मी पदवी संपादन करू शकली असे प्रतिपादन डॉ.पल्लवी सपकाळे यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार यांनी आमचे विद्यार्थी आमचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Protected Content