यावलच्या कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.

 

प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांनी केले. प्रथम सत्रात मंजुश्री गायकवाड यांनी ‘स्पर्धा परीक्षेतून व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात राजेश्री सुरवाडे सामाजिक कार्यकर्ता भुसावळ यांनी ‘महिलांवरील अत्याचार व कायदा’ या विषयावर प्रतिपादन केले. तिसऱ्या सत्रात एन. डी. महाले उपशिक्षक सरस्वती विद्या मंदिर यावल यांनी ‘संवाद व्यक्तिमत्त्व व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी ‘विचारांचे व्यक्तिमत्व विकास स्थान ‘या विषयावर विचार व्यक्त केले. सदर सत्रांचे अध्यक्षस्थान प्रा. संजय पाटील व प्रा. मनोज पाटील यांनी भूषविले.
समारोपाच्या कार्यक्रमात सायली चौधरी ,फैजपूर व डिंपल पाटील, भुसावळ यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शन केले की, मुलींमध्ये अनेक क्षमता असतात. प्रत्येकीने आपली आवड काय आहे याचा शोध घ्यावा. त्या अनुषंगाने प्रयत्न करावा. यश आपल्या हातात असते .भविष्यात करिअर करताना कुटुंब ,नातेसंबंध याचादेखील प्रामुख्याने विचार करावा. या कार्यशाळेत कोटेचा महिला महाविद्यालय ,दे .ना .भोळे महाविद्यालय ,धनाजी नाना महाविद्यालय , कला व विज्ञान महाविद्यालय भालोद व यावल महाविद्यालयातील एकूण ५० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
सूत्रसंचालन युवती सभा प्रमुख डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. पी. कापडे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. आर. डी. पवार , डाॅ. एच. जी. भंगाळे , नरेंद्र पाटील , सुभाष कामडी , मिलिंद बोरघडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content