नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातील नक्षलवादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष अमित शहा केंद्रीत केलं आहे. सध्याच्या नक्षलवाद्यांविरोधातील कारवायांवर ते नाराज आहेत. नक्षलवाद्यांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी नवी योजना आखण्याच्या ते तयारीत आहेत.
त्यांनी गेल्या महिन्यांत अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. नक्षलवाद्यांचे अड्डे संपवू शकत नसलेल्या सुरक्षा दलांची माहितीही मागवली. गृहमंत्र्यांच्या या आढावा बैठकीत केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पाच राज्यांतील सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता.
नक्षलवादाच्या समस्येशी निपटण्यासाठी केव्हा आणि कुठे अडचण येत आहे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. एका सीआरपीएफच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात येत्या उन्हाळ्यापर्यंत नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यांना संपवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.”
अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीनंतर लगेचच सीपीआयनं २ नोव्हेंबर रोजी याबाबत जाहीर वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी दावा केला होता की, छत्तीसगडमध्ये नोव्हेंबर २०२० पासून जून २०१४ दरम्यान प्रहार-३ नावाच्या कारवाईची एक योजना आखली जात आहे. मात्र, हे ऑपरेशन कधी सुरु होईल याबाबत माहिती मिळू शकली नाही.
सर्वाधिक लक्ष हे छत्तीसगडवर केंद्रीत करण्यात आलं आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर लगेचच विजयकुमार हे बस्तरमधील परिस्थितीची समिक्षा करण्यासाठी राज्य आणि केंद्राच्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सुकमासाठी निघाले होते.
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी स्थानिक लोकांना आपल्या गटात सहभागी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविरोधात गुप्तचर यंत्रणांनी काही रणनीती तयार केली आहे. गृहमंत्र्यांनी राज्य आणि केंद्रीय पोलिसांना परस्परांमध्ये चांगला ताळमेळ ठेवण्यास सांगितलं आहे.