जळगाव विद्यापीठात ४ जानेवारीला ‘दीक्षांत समारंभ’

university

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ येत्या शनिवार, (दि.४ जानेवारी) रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या दीक्षांत समारंभासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख वस्तू व्युत्पन्न व्यापार, सिटी बँक, अमेरिका येथील सुनील देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुळचे सांगली येथील रहिवासी असलेले सुनील देशमुख हे गेली ४० वर्ष अमेरिकेत राहत आहेत. वॉल स्ट्रीटवर त्यांनी कमोडिटी ट्रेडिंगमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक व साहित्य क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र फॉउडेशनच्या माध्यमातून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. सुनील देशमुख यांनी महाराष्ट्र फॉउडेशनला १९९० मध्ये दोन कोटी रुपये देऊन ही पुरस्कार योजना सुरु केल होती. एम.एस. केमिकल अभियांत्रिकी, एमबीए आणि जेडी [ज्युरिस डॉक्टर] असे शिक्षण घेतलेल्या सुनील देशमुख यांचा दीक्षांत समारंभातील पदवीधरांशी होणारा संवाद हा निश्चित आगळा-वेगळा राहील.

३८ हजार २८२ स्रातक :-
या पदवीप्रदान समारंभात ३८ हजार २८२ स्रातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहेत. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १६ हजार ३३९ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ६ हजार ५०३ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे १४ हजार ३३३ आणि आंतर विद्याशाखेचे १ हजार १०७ स्रातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बी.टेक.चे ४५८ आणि एम.टेक.चे ०५ अशी एकूण ४६३ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील ९५ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. यामध्ये ६१ विद्यार्थिनी व ३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २० हजार ३१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये २५० पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत.

पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था
या पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेने नाव तसेच सातकाच्या आईचे नाव आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडच्या सहाय्याने मोबाईल अप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणी करता येईल. प्रमाणपत्रावरील विद्यापीठाच्या होलोग्राममुळे प्रमाणपत्राची सुरक्षितता अधिक वाढली आहे. दीक्षांत समारंभाच्या दिवशी प्रशासकीय इमारतीच्या परिसरात सातकांसाठी सेल्फीस्टॅड उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर स्रातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल मॅसेजद्वारे देखील डिग्री कोड पाठविण्यात आला आहे. सातकांनी पदवी ग्रहण करण्यासाठी सभारंभाच्या दिवसी प्राप्त झालेली डिग्री कोड, ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, सातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरीता पदवी प्रमाणपत्राचे वाटप अभ्यासक्रमनिहाय खालील प्रमाणे प्रशासकीय इमारतीत काऊंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

*खिडकी क्र.१ वर बी.ए.इंग्रजी आणि डी.पी.ए.वी.एफ.ए., बी.एस.डब्ल्यू. एम.एफ.ए., एम.ए.- बुमन स्टडीज, मास कम्युनिकेशन, एम.एस. डब्ल्यु. बी.ए. व एम.ए. म्युझिक.
*खिडकी क्र.२ वर बी.ए.- मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, जनरल आणि एम.ए.-इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत व उर्दू तसेच एम.ए.-इंग्रजी, मराठी व हिंदी (सीएलएल).
*खिडकी क्र.३ बर बी.ए. व एम.ए.- इतिहास, भुगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षणशाख, तत्वज्ञान, ड्रामाटिक्स, योगीकशास्त्र, आंबेडकर थॉटस्.
*खिडकी क्र.४ वर विधी व वैद्यकीय आणि औषधीर्निमाणशास्त्र.
*खिडकी क्र.५ वर बी.एस्सी. केमेस्ट्री व कॉम्प्युटर सायन्स वगळता बी.एस्सी. सर्व विषय
*खिडकी क्र.६ वर बी.एस्सी. केमेस्ट्री व कॉम्प्युटर सायन्स, बी.सी.ए., एम.सी.ए., बी.व्होक सर्व विषय.
*खिडकी क्र.७ वर एम.ए., एम.एस्सी. भुगोलसह एम.एस्सी. सर्व विषय.
*खिडकी क्र.८ वर शिक्षणशास्त्र विद्याशाख सर्व, बी.टेक., एम.टेक व एम.ई. सर्व विषय.
*खिडकी क्र.९ वर बी.ई. सर्व विषय व आर्कीटेक्चर.
*खिडकी क्र.१० वर बी.कॉम व एम.कॉम, व्यवस्थापनशास्त्र सर्व विषय.
*खिडकी क्र.११ वर पीएच.डी. सर्व विषय व एम.फील., सुर्वणपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नाव नोंदणी प्रशासकीय इमारत, बांधकाम विभाग दालन क्र.१२५ मध्ये करण्यात येणार आहे.

समारंभासाठी विद्यार्थ्यांसाठी वेळ व पोशाख
यावेळी दिव्यांग स्रातकांसाठी सर्व अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्र चौकशी कक्ष येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतचा सर्व तपशील विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. समारंभस्थळी सकाळी ठिक ९ वाजता विद्यार्थी व निमंत्रितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. समारंभासाठी विद्यार्थ्यांसाठी पांढऱ्या रंगाचा शर्ट. पांढऱ्या रंगाची पॅन्ट किंवा पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे चुस्त तर विद्यार्थिनीसाठी लाल किनार असलेली पांढरी साडी, लाल रंगाचे ब्लाऊज किंवा लाल रंगाचा कुर्ता (कमीज) व पांढऱ्या रंगाची सलवार असा पोशाख असावा.

दोन हजार निमंत्रितांची आसन व्यवस्था
तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (live) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनाही बघता यावे, यासाठी महाविद्यालयांनी व्यवस्था करावयाची आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांना सूचना निर्गमीत केलेल्या आहेत. तयारी पूर्ण विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणाऱ्या समारंभाची तयारी पूर्ण झाली असून जवळपास दोन हजार निमंत्रितांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या सर्व समित्यांमार्फत कामकाजाचा आढावा कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

Protected Content