अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पंचायत समिती अमळनेर व अमळनेर तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तहसिल कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी खेळाडू, शिक्षक, व क्रीडा प्रेमी यांनी राष्ट्रीय एकता विषयी शपथ घेतली.तसेच एकता व एकात्मता टिकविण्यासाठी ” एकता दौड”(Run for Unity) ३ किमी अंतर धाऊन सहभाग घेऊन एकता टिकविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती ग्रामपंचायत विस्ताराधिकारी एल.डी. चिंचोरे, प्रमुख पाहुणे म्हणुन तालुका माध्यमिक संघ अध्यक्ष संजय पाटील, मुख्याध्यापक तुषार बोरसे, मुख्याध्यापक एच. आर. पाटील, तालुका क्रीडा समन्वयक एस पी वाघ, प्रा. ए.के. अग्रवाल, समिती सचिव महेश माळी, प्रा.सचिन पाटील, सहसचिव आर.आर. सोनवणे होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.डी. विसपुते, एन.एल. पाटील, आर एल पाटील, पी आर चौधरी, बापुराव सांगोरे, श्याम शिंगाणे, हर्षदा सुर्यवंशी, गोकुळ बोरसे, अतुल बोरसे, विदयापीठ व राज्य खेळाडू गिरीश रोंदळे, राज्य खेळाडु वैभव साळी, जयेश सैंदाणे, दर्शन भावसार, ऋषिकेश बारी, मुकेश बाविस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रम सुत्रसंचालन एस.पी. वाघ यांनी केले तर आभार आर.आर. सोनवणे यांनी केले.