अमळनेर, गजानन पाटील । आगामी सण-उत्सवाचा पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत आगामी सण-उत्सव पोळा व गणपती उत्सव तसेच पुर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शासनाने व जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सुचानांबाबत अवगत करण्यात आले. बैठकीत पोळा सणानिमित्त कुठल्याही प्रकारच्या वाद्य वाजंत्रीसह किंवा साधी मिरवणूक देखील निघणार नाही. सार्वजनिक गणपती तसेच गावातील सार्वजनिक मूर्तीची उंची ही जास्तीत जास्त ४ फूट व घरगुती गणपती उंची ही जास्तीत जास्त २ फूट राहील असे स्पष्ट करण्यात आले. गणपती स्थापना व विसर्जन बाबत कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही. अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना गावात जास्तीत जास्त एक गाव एक गणपती बसविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/246499770708631