अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केवळ अमरावतीच नव्हे तर राज्यातील इतर जिल्ह्यांमधील आमदारांमध्येही खदखद असल्याचे सांगत यातूनच हे सरकार पडेल असा दावा आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
सध्या बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. ते अमरावतीमध्ये म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप प्रणित जे ईडी सरकार आलं आहे ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. अमरावतीतच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र खदखद दिसत आहे. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अंतर्गत खदखद सुरू झाल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारचा लवकरच अंत होईल असे भाकित नाना पटोले यांनी केले.
दरम्यान, नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारमध्ये असलेल्या अंतर्गत वादामुळे सरकारचा अंत होईल असंही पटोले म्हणालेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सरकार आहे ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही असंही ते म्हणाले.