अभिषेक पाटलांनी महिलेला पुढे करून कथीत हनी ट्रॅपचा बनाव केला; मनोज वाणी यांचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । आपल्यावर आरोप असलेल्या महिलेलाच पुढे करुन आपल्याकडून कोट्यवधीची खंडणी उकळण्याचा डाव होता, तो फसला म्हणूनच अभिषेक पाटील यांनी कथीत हनी ट्रॅपचा बनाव केल्याचा आरोप या प्रकरणातील मनोज वाणी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्याशिवाय अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्रींनी पाच वर्षांपूर्वी असाच हनी ट्रॅप यशस्वी केला होता असा दावा करत त्यांच्या मालकीच्या एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालायचा असाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, वाणी यांनी आंटीची कथित ऑडीओ क्लीप यावेळी सादर केली.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्याला एका महिलेला पुढे करून हनी ट्रॅपमध्ये अडकाविण्याचा प्रयत्न केला होता, यासाठी मनोज वाणी यांनी या महिलेला ५० हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते, असा आरोप केला होता. त्यानंतर दोघांच्या जबाबावरुन याप्रकरणी मनोज वाणी, आंटी व आणखी एक अशा तिघांविरुध्द अभिषेक पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आपल्यावरील आरोप फेटाळून लावण्यासाठी मनोज वाणी यांनी आज पत्रकार परिषद घेतली, मात्र त्यात ते एकही पुरावा देऊ शकले नाहीत. आंटीची एक ऑडीओ क्लीप त्यांनी सादर केली. त्यात अभिषेक पाटील यांनी तू वाणी यांचे नाव घे, तुझे आयुष्याचे कल्याण होईल असा उल्लेख आहे. या क्लीपमध्ये वाणी आणि महिलेचा संवाद आहे. त्याआधी व नंतरचा संवाद नाही. आपण फक्त इतकीच क्लीप एडीट करुन घेतली आहे, असे वाणी यांनी सांगितलेय.

अभिषेक पाटील व त्यांच्या मातोश्रींनी पाच वर्षांपूर्वी असाच हनी ट्रॅप यशस्वी केला होता, परंतु कालांतराने ट्रॅपमधील महिलेने न्यायालयात तशी कबुली दिल्याचा दावा मनोज वाणी यांनी केला आहे. त्याशिवाय नोकरीला लावून देण्यासाठी त्यांनी पक्षातील अनेकांकडून लाखो रुपये घेतले आहे. असाही आरोप वाणी यांनी केला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2648767098708858/

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1446090745590773/

Protected Content